High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

Shreya Maskar

हाय ब्लड प्रेशर

तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांच्या आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश आताच करा, जेणेकरून त्यांचा बीपी कायम नियंत्रणात राहील.

High Blood Pressure | pinterest

हेल्दी भाजी

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी कारले ही हेल्दी भाजी आहे. कारल्यातील विशेष पोषक तत्वे केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाहीत, तर रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासही मदत करतात.

Healthy Vegetable | pinterest

हेल्दी फळ

उच्च रक्तदाबासाठी पेरू हे एक उत्तम फळ आहे. पेरूमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम आपल्या शरीरातील सोडियमचे हानिकारक परिणाम कमी करते, ज्यामुळे सामान्य रक्तदाब राखण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

Healthy Fruit | pinterest

हेल्दी पीठ

तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, तर तुमच्या आहारात जवसाच्या पिठाचा समावेश करा. जवसाच्या पिठात फायबर भरपूर प्रमाणात असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास आणि तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

Healthy Flour | pinterest

हेल्दी ड्रायफ्रूट

बदाम केवळ बुद्धीच तल्लख करत नाहीत, तर तुमच्या हृदयाचीही काळजी घेतात. त्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतात, जे रक्तदाब कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे ४-५ बदाम सोलून रात्रभर पाण्यात भिजवून खाणे.

Healthy Dry Fruit | pinterest

जवसाच्या बिया

जवसाच्या बिया ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबरने समृद्ध असतात. दररोज एक चमचा भाजलेल्या जवसाच्या बिया खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Flaxseeds | pinterest

हेल्दी तेल

उच्च रक्तदाबासाठी ऑलिव्ह ऑइल फायदेशीर आहे. यामुळे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

Healthy Oil | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

High Blood Pressure | AI PHOTO
येथे क्लिक करा...