Shreya Maskar
उच्च रक्तदाब असल्यास मांसाहार विशेषतः जास्त करणे टाळा. लाल मांस आणि अंड्याचा पिवळा बलक खाणे टाळणे आवश्यक आहे. यामध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
बऱ्याच लोकांना जेवणात जास्त मीठ किंवा जेवताना मीठ लागते मात्र ही सवय घातक ठरू शकते. मिठामध्ये सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. खूपच कमी प्रमाणात मीठ वापरा.
कॅफीनमुळे तुमचा रक्तदाब वाढतो, त्यामुळे कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळा. तुम्हाला जास्तच रक्तदाबाचा त्रास होत असेल तर चहा आणि कॉफी पिणे बंद करा. कॉफीमधील कॅफीन हळूहळू तुमचा रक्तदाब वाढवते.
पिझ्झा, बर्गर, चिप्स यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. त्यामध्ये आढळणारी चरबी आणि सोडियम उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
जास्त मद्यपान केल्याने रक्तदाबाची पातळी वाढू शकते. मद्यामध्ये कॅलरीज जास्त असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते. जो उच्च रक्तदाबासाठी एक धोकादायक घटक आहे.
साखर अनेक प्रकारे तुमचा रक्तदाब वाढवते. साखरयुक्त पेये प्यायल्याने वजन वाढते. अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. अतिरिक्त साखरेचा रक्तदाब वाढवण्यावर थेट परिणाम होतो.
लोणचे उच्च रक्तदाबासाठी हानिकारक असते, याचे मुख्य कारण म्हणजे त्यात वापरले जाणारे सोडिअमचे प्रमाण खूप जास्त असते. लोणचे टिकवण्यासाठी भरपूर प्रमाणात सोडिअम वापरले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.