Ankush Dhavre
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दमदार कमबॅक केलं आहे.
१४ महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या शमीने पहिल्याच सामन्यात ५ गडी बाद केले आहेत.
यासह त्याने सर्वात जलद २०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
दरम्यान कोण आहेत सर्वात जलद २०० गडी बाद करणारे गोलंदाज जाणून घ्या.
या यादीत मिचेल स्टार्क अव्वल स्थानी आहे. त्याने १०२ सामन्यात हा कारनामा केला आहे.
तर सकलेन मुश्ताक यांनी देखील १०४ सामन्यांमध्ये २०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता.
तर बोल्टने हा कारनामा १०७ सामन्यांमध्ये केला होता.