Shreya Maskar
रोजच्या छोट्या भुकेसाठी झटपट दुधी भोपळ्याचे थेपले बनवा.
दुधी भोपळ्याचे थेपले बनवण्यासाठी दुधी भोपळा, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, जिरे, बडीशेप, पाणी, गव्हाचे पीठ, ओवा, तीळ, कसुरी मेथी, मीठ, हळद, दही आणि लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळ्याचे थेपले बनवण्यासाठी दुधी भोपळ्याचे साल काढून तो किसून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, धणे, जिरे आणि बडीशेप घालून वाटण तयार करा.
त्यानंतर ताटात गव्हाचे पीठ, ओवा, तीळ, कसुरी मेथी, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, भोपळ्याचा किस, वाटण आणि दही घालून पीठ चांगले मळून घ्या.
पिठाचे गोळे तयार करुन चपातीसारखे लाटून घ्या.
तयार थेपले तेलात खरपूस तळून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत दुधी भोपळ्याचे थेपले खा.