Manasvi Choudhary
आपण सर्वजण रोजच्या प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी पाण्याची बाटली वापरतो. मात्र, अनेकदा सतत पाण्याची बाटली वापरल्यामुळे बाटली खराब होऊ शकते.
बाटलीच्या आतील बाजूस चिकटपणा, दुर्गंधी किंवा पिवळे डाग जमा होतात. अस्वच्छ बाटलीतून पाणी प्यायल्याने पोटाचे विकार किंवा आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
पाण्याची बाटली स्वच्छ करण्याची सोपी पद्धत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर तुमची बाटली चिकट झाली असेल, तर कोमट पाण्यात १ ते २ चमचे बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण बाटलीत भरा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. यानंतर ब्रशने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे बाटलीमधील सर्व चिकटपणा निघून जाईल.
बाटलीवरील हट्टी डाग आणि दुर्गंधी काढण्यासाठी व्हिनेगर सर्वोत्तम आहे. एका भांड्यात कोमट पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळा आणि हे मिश्रण बाटलीत व झाकणावर लावून १५ ते २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
एका वाटीत बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट बाटलीच्या आतील बाजूस लावा आणि काही वेळ भिजवून ठेवा. लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या अभिक्रियेमुळे बाटली अगदी चकाचक साफ होते.
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवून त्यात कडुलिंबाची काही पाने आणि लिंबाच्या चकत्या टाका. या कोमट पाण्यात काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या काही वेळ भिजत ठेवा. कडुलिंबाच्या गुणधर्मांमुळे बाटलीतील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ताजेपणा राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सलला घ्या.