Corn Upma Recipe: रव्याच्या उपमा खाऊन कंटाळलात? ट्राय करा झटपट मक्याच्या उपमा, वाचा रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

झटपट नाश्ता

तुम्हाला रोजचा नाश्ता करून कंटाळा आला असेल तर तुम्ही मक्याच्या उपम्याची रेसिपी एकदा ट्राय करू शकता.

corn upma recipe

हेल्दी नाश्ता

मके तुम्हाला सहज बाजारात मिळतील. हा नाश्ता पौष्टीक आणि नक्कीच लहान मुलांना आवडणारा ठरेल.

healthy breakfast

मक्याचा उपमा कसा बनवायचा?

पुढील माहितीत आपण याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साहित्य कमी जास्त करू शकता.

healthy breakfast

उपम्याचे साहित्य

दोन वाट्या मक्याचे पीठ, ४-५ लाल किंवा हिरव्या मिरच्या, शेंगदाणे किंवा वाटाणे, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, मीठ, हळद, तेल इ.

corn flour upma

स्टेप १

सर्वप्रथम मक्याचे पीठजाडसर दळून घ्या. मग ते पीठ कोरडे भाजून घ्या. आता कढईच तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्या, कांदा आणि शेंगदाणे, वाटाणे परतून घ्या.

corn flour upma

स्टेप २

सर्व फोडणी करून पाण्याला उकळी आल्यावर त्यात पीठ घाला.

healthy breakfast recipe

स्टेप ३

गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. पुढे चवीला साखर, मीठ घाला.

healthy breakfast recipe

स्टेप ४

खाताना वरून टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव घालावी आणि लिंबू पिळा. उपमा खूपच चविष्ट लागतो. तो गरमा गरम सर्व्ह करा.

healthy breakfast recipe

NEXT: घसा अचानक दुखतोय? असू शकतो मानेच्या कॅन्सरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

neck cancer early symptoms
येथे क्लिक करा