Jowar Masala Bhakri: अशी बनवा ज्वारीची मसाला भाकरी, लहान मुलंही करतील पटकन फस्त

Surabhi Jayashree Jagdish

ज्वारीची भाकरी

नुसती ज्वारीची भाकरी रोज खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल. अशावेळी भाकरीला थोडा मसालेदार ट्विस्ट दिला तर तीच भाकरी खूप चविष्ट लागते. ज्वारीची मसाला भाकरी ही पौष्टिक आणि चवदार पर्याय आहे.

masala bhakri

साहित्य

ज्वारीचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मसाले हे मुख्य साहित्य लागतं. काही जण त्यात किसलेलं गाजर, काकडी किंवा तीळही घालतात, ज्यामुळे चव आणि पोषण वाढते.

healthy indian bread

भाज्या आधी मिक्स करा

सर्व चिरलेल्या भाज्या आणि मसाले एका भांड्यात नीट मिसळून घ्या. या मिश्रणाला थोडा वेळ झाकून ठेवल्यास भाज्यांमधून पाणी सुटतं आणि ते मऊ होतात. त्यामुळे भाकरी थापताना तुटत नाही आणि आकार देणं सोपं होतं.

gluten free roti

पीठ मळण्याची पद्धत

भाज्यांच्या मिश्रणात ज्वारीचं पीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा. आवश्यकतेनुसार, गरम पाणी घालून मऊ आणि लवचिक पीठ तयार करा. गरम पाणी वापरल्यामुळे पीठ मऊ राहतं आणि भाकरी छान बनते.

jowar flour recipe

पीठ झाकून ठेवा

मळलेलं पीठ ५-१० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे पीठ सेट होतं आणि लाटताना किंवा थापताना तुटत नाही. ही छोटी स्टेप भाकरी मऊ बनवण्यासाठी खूप महत्त्वाची असते.

bhakri making tips

भाकरी थापण्याची पद्धत

पीठाचे छोटे गोळे करून हाताने किंवा लाटण्याने भाकरी तयार करा. ज्वारीचं पीठ ग्लूटेन-फ्री असल्यामुळे हलक्या हाताने थापणं गरजेचं असतं. थोडं पीठ लावून गोल आकार देण्याचा प्रयत्न करा.

indian flatbread recipe

भाजण्याची योग्य पद्धत

तवा गरम करून त्यावर भाकरी ठेवा आणि दोन्ही बाजूंनी भाजा. भाकरीवर हलके दाब दिल्यास ती फुगते आणि आतून नीट शिजते. हवे असल्यास थोडं तूप किंवा तेल लावल्याने चव अजून वाढते.

millet recipes India

Bra design: ब्रामध्ये एकसारखे 3 हुक का असतात? 99 टक्के मुलींनाही माहिती नसेल कारण

Bra design | SAAM TV
येथे क्लिक करा