7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

Manasvi Choudhary

व्हेज मसाला राईस

व्हेज मसाला राईस बनवण्यासाठी कढईत गरम तेलामध्ये कांदा- मिरची परतून घ्या.

नंतर त्यात गाजर सिमला मिरची आणि कॉर्न मिक्स करा.

मसाला, हळद आण गरम मसाला मिक्स करा

शिजवलेला भात घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

भातावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे चांगले शिजवून घ्या.

Veg Masala Rice

गार्लिक व्हेज राईस

गार्लिक व्हेज राईस बनवण्यासाठी गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण परतून घ्या.

नंतर त्यात कांदा, गाजर आणि सिमला मिरची बारीक चिरून मिक्स करा.

चवीनुसार या मिश्रणात मीठ, चिली फ्लेक्स मिक्स करा.

शिजवलेला भात चांगला मिक्स करून घ्या. शेवटी यात बारीक चिरलेली कांद्याची पात मिक्स करा.

Garlic Veg Rice

मटार राईस

मटार राईस बनवण्यासाठी कढईत गरम तेलामध्ये जिरे, कांदा, हिरवी मिरची आणि आले परतून घ्या.

नंतर त्यात मटार मिक्स करून घ्या. मटार मऊ शिजवा.

मिश्रणात मीठ आणि मसाले, गरम मसाले मिक्सकरा.

शिजवलेला भात मिक्स करून घ्या. भातावर झाकण ठेवा. गरमागरम मटार राईस तयार होईल.

Matar Rice

लेमन राईस

लेमन राईस बनवण्यासाठी कढईत गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्स करा. शेंगदाणे छान परतून घ्या

नंतर यात हळद आणि मीठ मिक्स करा.

शिजवलेला भात मिक्स करून संपूर्ण मिश्रण चमच्याने एकजीव करा.

१० मिनिटांनी गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.

Lemon Rice

पनीर व्हेज राईस

पनीर व्हेज राईस बनवण्यासठी सर्वातआधी पनीरचे चौकोनी तुकडे करा आणि कढईत तेलामध्ये फ्राय करून घ्या.

नंतर यात कांदा, गाजर, सिमला मिरची आणि कॉर्न घालून मिक्स करा.

शिजवेला भात मिक्स करा. यात मसाले, मीठ, काळी मिरी पावडर, चिली पावडर नीट मिक्स करा.

संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या नंतर यात पनीर मिक्स करा. अशाप्रकारे पनीर राईस तयार होईल.

Paneer Veg Rice

टोमॅटो राईस

टोमॅटो राईस बनवण्यासाठी कढईत गरम तेलामध्ये कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.

नंतर यात टोमॅटोच्या फोडी मिक्स करा. तसेच गाजर, वटाणे मिक्स करा. मसाले आणि मीठ मिक्स करा.

शिजवलेला भात मिक्स करून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Tomato Rice

पालक- मटार राईस

पालक- मटार राईस बनवण्यासाठी कढईत गरम तेलामध्ये लसूण आण कांदा परतून घ्या. मटार घालून संपूर्ण मिश्रण परतून घ्या.

नंतर यात पालकची प्युरी मिक्स करा. शिजवलेला भात मिक्स करून त्यात काळी मिरी आणि चिली फ्लेक्स मिक्स करा.

अशाप्रकारे घरच्या घरी पालक मटार राईस तयार होईल.

Palak Matar Rice

NEXT: Green Colur Saree Designs For Navratri: नवरात्रीसाठी हिरव्या रंगाच्या साडीचे न्यू कलेक्शन, पाहा लेटेस्ट 7 डिझाईन्स

Green Colur Saree Designs For Navratri
येथे क्लिक करा..