Calcium Rich Foods : दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देतात 'हे' ५ पदार्थ, हाडं बनतील लोखंडासारखी मजबूत

Shreya Maskar

दूध

दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे आवश्यक पोषक प्रदान करते, जे हाडांना मजबूत करण्यास मदत करते. दुधाव्यतिरिक्त हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ कोणते, जाणून घेऊयात.

Milk | pinterest

नाचणी (रागी)

नाचणी या धान्यात भरपूर कॅल्शियम असते. भरपूर कॅल्शियममुळे हाडे आणि दात बळकट होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. सकाळची पेज (लापशी), चपात्या, डोसे या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करा.

Ragi | pinterest

तीळ

तीळ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारख्या आवश्यक खनिजांचे समृद्ध आहे. ही खनिजे हाडांची घनता वाढवण्याचे आणि ती टिकवून ठेवण्याचे काम करतात.

Sesame Seeds | pinterest

राजगिरा

राजगिरा उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. राजगिरा कॅल्शियम, लोह आणि प्रथिनांनी समृद्ध आहे. हाडांच्या मजबुतीसाठी राजगिरा हा दही, गूळ , सुकामेवा सोबत खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

Rajgira | pinterest

शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन 'के' भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हाडे मजबूत करण्यास आणि त्यांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात.डाळ, भाज्या, सूप यामध्ये टाकून तुम्ही याचा आस्वाद घ्या.

Drumstick Leaves | pinterest

बदाम

बदाममध्ये निरोगी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई सोबत कॅल्शियम असते. बदाम तुम्ही भिजवून किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.

Almond | pinterest

टोफू

टोफू हाडांसाठी फायदेशीर आहे, कारण ते जास्त प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने आणि आयसोफ्लाव्होन नावाचे विशेष वनस्पती संयुगे प्रदान करते. जे हाडांची घनता वाढवण्यास आणि हाडांची झीज कमी करण्यास मदत करते.

Tofu | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रोज एक वाटी प्या 'ही' डाळ, चविष्ट रेसिपी लिहून घ्या

Weight Loss | AI PHOTO
येथे क्लिक करा...