Chetan Bodke
आज 'जागतिक महिला दिन' आहे. 'इन्स्पायर इन्क्लूजन' थीमवर यावर्षाचा महिला दिन साजरा केला जात आहे.
महिलांच्या हक्कांसाठी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आवाज उठवला जातो. यामध्ये चित्रपटही एक माध्यम आहे.
असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे पर्सनल लाईफमध्ये महिला कल्याणासाठी काम करीत आहेत.
वूमन सेल्फ-डिफेन्स सेंटर (WSDC) नावाच्या सेल्फ-डिफेन्स कोचिंग सेंटरचा अक्षय कुमार मालक आहे, जे महिलांना मोफत स्वसंरक्षण शिकवते.
बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा- जोनास युनिसेफमध्ये सक्रिय आहे. यामध्ये ती तरूणींसाठी आणि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी काम करते.
शबाना आझमी यांनी १९९९ मध्ये मिजवान वेलफेअर सोसायटी सुरू केली. ही NGO आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलींच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी मदत करते.
शाहरुख खान मीर फाऊंडेशन नावाच्या एनजीओतून महिला सक्षमीकरणासाठी काम करतो. शाहरुखची मीर फाऊंडेशन नावाची एनजीओ आहे. ही एनजीओ संस्था ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या रोजगारासाठी मदत करते.