Shreya Maskar
आज ( 2 एप्रिल ) बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणचा वाढदिवस आहे.
आज अजय देवगण 56 वर्षांचा झाला आहे.
बॉलिवूडमध्ये तो ॲक्शन किंग म्हणून ओळखला जातो.
अजयने 'फूल और कांटे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली.
मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगणची संपत्ती जवळपास 427 कोटी रुपये इतकी आहे.
अजय देवगणने चित्रपटांमध्ये सर्वात जास्त पोलिसाची भूमिका केल्या असून त्या खूप गाजल्या आहेत.
अजय देवगण याचे खरे नाव विशाल वीरू देवगण असे आहे.
इंडस्ट्रीत येण्याआधी अजय देवगणने आपले नाव बदलले.