Propose Day Special Bollywood Stars: 'या' सेलिब्रिटींसारखे प्रपोज केले तर होऊ शकता यशस्वी

Chetan Bodke

व्हॅलेंटाईन वीकमधला दुसरा दिवस

व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. आज व्हॅलेंटाईन वीकमधला दुसरा दिवस. आज प्रपोज डे आहे.

Ranveer-Deepika | Instagram

प्रपोज डे निमित्त हटके प्रपोज

प्रपोज डे निमित्त आपण बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या लाईफ पार्टनरला हटक्या अंदाजात प्रपोज केला आहे.

Kareena Kapoor And Saif Ali Khan | Instagram

शाहरूख खान आणि गौरी खान

रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान प्रेयसी गौरीला अनेक वर्षे डेट करत होता. शाहरुखने गौरीला मुंबईत समुद्र किनाऱ्यावर लग्नासाठी प्रपोज केला होता.

Shah Rukh Khan And Gauri Khan | Instagram

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्हस्टोरी आजही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असते. 'कुछ ना कहो' चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

Shah Rukh Khan And Gauri Khan | Saam Tv

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

जंगल सफारीदरम्यान रणबीर कपूरने आलिया भट्टला प्रपोज केला होता. गुडघ्यावर बसून अभिनेत्याने आलियाला अंगठी घातली आणि तिला लग्नासाठी प्रपोज केला होता. आलियाने इंस्टाग्रामवर त्या दरम्यानचा एक फोटोही शेअर केला आहे.

Ranbir- Alia | Instagram

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लव्हस्टोरीही खूप फिल्मी आहे. अवघ्या काही भेटीतच एकमेकांचं एकमेकांवर प्रेम जडलं. एका ट्रिप दरम्यान नीकने गुडघ्यावर बसून प्रियांकाला प्रपोज केले होते.

Priyanka Chopra And Nick Jonas Photos | Instagram

सैफ अली खान आणि करीना कपूर

सैफ अली खाननेही करीना कपूरला अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज केला होता. ज्या ठिकाणी सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोर यांना प्रपोज केला होता. त्याच ठिकाणी म्हणजेच पॅरिसमध्ये सैफने करिनाला प्रपोज केला होता.

Kareena Kapoor And Saif Ali Khan | Instagram

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनीही एकमेकांना अनेक दिवस डेट केल्यानंतर लग्न केलं. लग्नापूर्वी दोघेही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणवीरने दीपिकाला समुद्रकिनारी लग्नासाठी प्रपोज केला होता.

Deepika Padukone And Ranveer Singh | Instagram

विकी कौशल आणि कतरिना कैफ

आपल्या हटक्या लव्हस्टोरीमुळे तर कधी त्यांच्या रोमँटिक अंदाजामुळे विकी- कतरिना चर्चेत असतात. विकी आणि कतरिनाने लग्नाआधी एकमेकांना काही वर्षे डेट केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, विकीने लग्नाच्या एक दिवस आधी कतरिनाजवळ प्रेम व्यक्त केले.

Katrina Kaif And Vicky Kaushal | Instagram

NEXT: स्टायलिश साडीत गोऱ्यापान अपूर्वा नेमळेकरने केला कहर; फॅन्सना आठवली शेवंता

Apurva Nemlekar Photos | Instagram
येथे क्लिक करा....