Chetan Bodke
'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
अपूर्वाला शेवंता या पात्राने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे.
सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकर नेहमीच सक्रिय असते.
अपूर्वाने नुकतंच राखाडी रंगाची साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले.
शेअर केलेल्या फोटोमध्ये, अपूर्वाने राखाडी रंगाची सिंपल साडी वेअर केले असून सर्वच तिच्या निस्सिम सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
अभिनेत्रीने यावेळी साडीवर ऑक्साईड दागिने वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.
अभिनेत्रीने साडीला मॅचिंग मेकअप करीत आपला लूक पूर्ण केला आहे.
अपूर्वाच्या ह्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
अपूर्वा 'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती ठरली होती.