Priya More
बॉलिवूडची 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' कंगना रनौत तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
कंगना रनौतने नुकताच गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
कंगना रनौतने द्वारकाधीश मंदिरात जाऊन देवाच्या चरणी माथा टेकवून पूजा केली.
कंगनाला मंदिरामध्ये पाहून त्याठिकाणी आलेले भाविक आश्चर्यचकीत झाले. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी गर्दी केली
देवाचं दर्शन घेतल्यानंतर कंगनाने नदीमध्ये बोटीतून प्रवास करण्याचाही आनंद घेतला.
कंगना रनौतने यावेळी सोनेरी रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
कंगना रनौतने कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली लावली होती. या टिकलीने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले.
सूर्यास्ताच्या वेळी पडलेल्या सोनेरी किरणांमध्ये अक्षरश: कंगना रनौत न्हावून निघाल्यासारखी दिसत आहे.
सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये कंगनाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या फोटोंना चांगली पसंती दिली आहे.