Priya More
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या चर्चेत आल्या आहेत. समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
जया बच्चन या पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. 2004 पासून समाजवादी पक्ष त्यांना राज्यसभेवर पाठवत आहे.
जया बच्चन यांनी नुकताच राज्यसभा निवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले. यामध्ये त्यांनी चल- अचल संपत्तीचा उल्लेख केला आहे.
जया बच्चन आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची मिळून संपत्ती 1,578 कोटी रुपयांची आहे. 2022-23 या आर्थित वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये जया बच्चन यांची कमाई 1,63,56,190 रुपये होती. तर अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273,74,96,590 रुपयांची भर पडली आहे.
जया बच्चन यांच्याकडे 57 हजार 507 रुपये रोख आणि 10 कोटी 11 लाख 33 हजार 172 रुपये बँक खात्यात जमा आहेत.
त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्याकडे 12 लाख 75 हजार 446 रुपये रोख आणि 1 अब्ज 20 कोटी 45 लाख 62 हजार 83 रुपयांच्या बँक ठेवी आहेत.
जया बच्चन यांच्याकडे 40.97 कोटी रुपयांचे दागिने आहेत. तर अमिताभ यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आहेत.
जया बच्चन यांच्याकडे 9.82 लाख रुपयांची एक कार आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 16 कार आहेत ज्यांची एकूण किंमत 17.66 कोटी रुपये आहे.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 849.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.