Shreya Maskar
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण काही काळापासून तिच्या 8 तासांच्या शिफ्टच्या निर्णयावरून चांगलीच चर्चेत आहे. ती Kalki 2 या चित्रपटातूनही बाहेर पडली.
दीपिका पादुकोणने नुकतेच आपल्या ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिचे सौंदर्य आणि कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
केसांचा बन, ग्लॉसी मेकअप आणि डायमंड ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या चेहरा सुंदर ग्लो करत आहे.
दीपिकाच्या या हॉट फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहे. तिच्या फोटोंवर भरभरून हार्टचे इमोजी पाहायला मिळत आहेत.
2007 साली रिलीज झालेल्या 'ओम शांती ओम' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. दीपिका पादुकोणने बॉलिवूडसोबत साऊथ आणि हॉलिवूडमध्येही काम केले आहे.
दीपिका पादुकोण आता लवकरच शाहरुख खानच्या आगामी 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
दीपिका पादुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2024 मध्ये तिने गोंडस मुलीला जन्म दिला. जिचे नाव 'दुवा' असे आहे.
चित्रपट, जाहिराती, व्यवसाय, सोशल मीडिया पोस्ट, गुंतवणुक यांमधून दीपिका कोट्यावधी कमावते. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.