Manasvi Choudhary
सेलिब्रिटी स्टाईल मंगळसूत्राची सध्या प्रचंड क्रेझ आहे. लहान आणि अतिशय युनिक पॅटर्नमध्ये तुम्ही खास सेलिब्रिटी स्टाईल मंगळसूत्र निवडू शकता.
सेलिब्रिटी मंगळसूत्रामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्रीचे मंगळसूत्र डिझाईन निवडू शकता.
अभिनेत्री दीपिका पादुकोन ते कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण सॉलिटेअर ड्रॉप डिझाईन्सचे मंगळसूत्र परिधान करते. एक नाजूक सोन्याची साखळी आणि मध्यभागी एकच मोठा हिरा अशी स्टाईल आहे.
कियारा अडवाणी हॅलो डायमंड पेंडंट मंगळसूत्र परिधान करते ज्यामध्ये मध्यभागी एक मोठा हिरा आणि त्याच्या बाजूला छोट्या हिऱ्यांचे वर्तुळ असते.
आलिया भट्ट इन्फिनिटी / ईविल आय स्टाईल मंगळसूत्र परिधान करते. इन्फिनिटी / ईविल आय चिन्ह असलेले नाजूक मंगळसूत्र ती परिधान करते.
प्रियांका चोप्रा स्टाईल नॅचरल मोईसनाइट म्हणजेच मोठ्या आकाराचे पण वजनाने हलके आणि पारदर्शक खड्यांचे मंगळसूत्र घालते.
जर तुम्ही सेलिब्रिटींसारखे नाजूक मंगळसूत्र घालत असाल, तर 'व्ही-नेक' (V-Neck) किंवा 'डीप नेक' ब्लाऊज घाला, जेणेकरून मंगळसूत्र उठून दिसेल.
पिवळ्या सोन्यापेक्षा 'Rose Gold' ला जास्त पसंती मिळत आहे, कारण ते हिऱ्यांसोबत अधिक ग्लॅमरस दिसते.