Priya More
बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अॅनिमल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातील स्टारकास्टला निर्मात्यांकडून भली मोठी रक्कम देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
'अॅनिमल' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरला 70 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून फक्त ४ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
बॉबी देओलला 'अॅनिमल' चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूर यांनी २ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
अभिनेता बिपिन कार्कीला त्याच्या भूमिकेसाठी ५० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.
टीव्ही स्टार राघव बिनानीही 'अॅनिमल'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्याला ५० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.
शक्ती कपूर यांनी या चित्रपटासाठी फक्त ३० लाख रुपयांचे मानधन घेतलं आहे.
तृप्ती डिमरीने या चित्रपटासाठी ४० लाख रुपयांचे मानधन घेतलं आहे.