Chetan Bodke
लग्नानंतर बऱ्याच तरुणी आपल्या नावापुढे पतीचं आडनाव जोडतात. कारण काही जणांच्या दृष्टीकोनानुसार, लग्न झाल्यानंतर मुलीला आपल्या पतीच्या नावाने एक नवीन ओळख मिळते.
पण बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, त्यांनी आपलं माहेरचंच नाव लग्नानंतरही कायम ठेवले आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न झाले. पण अनुष्काने लग्नानंतर आपले अनुष्का शर्मा हे नाव असंच कायम ठेवले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांचे लग्न झाले आहे. पण लग्नानंतर आजही दीपिका कागदोपत्री पादुकोण हेच आडनाव लावते.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने लग्न केले आहे. आलियाने लग्नानंतर भट्ट हेच आडनाव कायम ठेवले.
कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचेही लग्न झाले आहे, कतरिनानेही लग्नानंतर आपले आडनाव बदलले नाही.
विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्नगाठ बांधली आहे. विद्या बालनची सर्वत्र आजही जुन्या नावानेच ओळख आहे.
सुप्रसिद्ध फिल्ममेकर आदित्य चोपडा यांच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्न केले आहे. तिने लग्नानंतर आपले मुखर्जी आडनाव कायम ठेवले.
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने लग्नानंतर आपले आडनाव बदलले नाही.