Chetan Bodke
बालकलाकार मायरा वायकुळची चर्चा फक्त आता मराठी टेलिव्हिजनसृष्टीत नाही तर, हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतही तिच्या अभिनयाची चर्चा सुरु असते.
मायरा सध्या कलर्स टिव्हीवरील ‘नीरजा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सोशल मीडियावर मायरा नेहमीच सक्रिय असते. नुकतंच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
मायराने शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये ब्ल्यू फ्यूझनमध्ये एक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या ड्रेसवर तिने Candid पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधले.
नव्या फोटोशूटमधील चिमुकल्या मायराच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या ड्रेसच्या डिझाईनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मायराच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मायरा फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर, तिच्या हटक्या फॅशन सेन्सनेही चाहत्यांचे लक्ष वेधते.
मायराने झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले होते.