Priya More
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करत होती.
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकरचे नाव घेतले जात होते.
उर्मिला मातोंडकरने त्यावेळी बॉलिवूडला एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले होते.
उर्मिला मातोंडकर आता सिनेसृष्टीपासून दूर असली तरी देखील ती चर्चेत असते.
५० वर्षांची उर्मिला मातोंडकर सौंदर्याच्या बाबतीत आजही आताच्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.
उर्मिला मातोंडकरने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
उर्मिला मातोंडकर एखाद्या परिसारखी दिसत आहे. ती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
उर्मिला मातोंडकरने लाइट पर्पल कलरचा गाऊन परिधान केला आहे. तिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
उर्मिला मातोंडकरे मोकळे केस, गळ्यात डायमंडचा नेकलेस, लाईट मेकअप आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केलाय.
उर्मिला मातोंडकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.