Chetan Bodke
टॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या तमन्ना भाटियाची चांगलीच चर्चा होत आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे, नृत्यशैलीमुळे चर्चेत राहणाऱ्या तमन्नाच्या फॅशनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.
नुकतंच तमन्नाने इन्स्टाग्रामवर पिंक कलरचा वेस्टर्न गाऊन वेअर करत स्टायलिश अंदाजामध्ये फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
या स्टायलिश आऊटफिटमध्ये अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केलेला दिसत असून एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस तिने दिल्या आहेत.
मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि स्टायलिश इयर रिंग्ज असा तिने फोटोमध्ये संपूर्ण लूक केला आहे.
तमन्ना भाटियाच्या किलर आणि ग्लॅमरस फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
तमन्नाचे हे फोटो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तमन्नाच्या या फोटोंवर क्वीन, गॉर्जियस, सो ब्युटीफूल, स्टनिंग, प्रिटी अशा कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
तमन्नाच्या ह्या फोटोंवर ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.