Chetan Bodke
‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून प्रसिद्ध होत असलेली शहनाज गिल नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
शहनाज गिल सर्वाधिक प्रकाशझोतात ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वापासून आली.
शहनाझ गिल उर्फ सना बॉलिवूडच्या ग्लॅमरस, हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.
शहनाज नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. नुकतेच तिने अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही खास अंदाजात फोटो शेअर केले.
शहनाजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, लाल रंगाचा गाऊन परिधान करत हटक्या स्टाईलमध्ये फोटोशूट केले.
वेस्टर्न गाऊनमध्ये शहनाजने स्मोकी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक असा तिने संपूर्ण लूक केलेला आहे.
‘Eyes On Me!’ असे कॅप्शन देत शहनाजने इन्स्टाग्रामवर हे नवे फोटो शेअर केले आहेत.
सध्या शहनाजच्या नव्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
शेहनाजच्या फोटोंवर ५ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.