Manasvi Choudhary
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेसने आणि अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.
शिल्पा शेट्टीने आज चाळीशी पार केली तरीही ती अत्यंत तरुण आणि सुंदर दिसते. टॉपच्या अभिनेत्रींना शिल्पा शेट्टीने तिच्या सौंदर्याने फिकं पाडलं आहे.
शिल्पा केवळ अभिनेत्रीच नाही तर आज एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.
तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. आज ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसणारी शिल्पा शेट्टी लहानपणी कशी दिसत होती, हे तुम्ही कधी पाहिले आहे का?
शिल्पा शेट्टीचे काही जुने आणि बालपणीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्ही चकीत व्हाल.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिल्पा शेट्टी बालपणी खुपच निरागस, साधी सिंपल होती.
तिचे मोठे डोळे, कपाळी छोटीशी टिकली आणि केसांची स्टाईल साधी सिंपल आहे. मात्र मागील गेल्या काही काळात शिल्पा शेट्टीमध्ये जबरदस्त ट्रान्सफर्मेशन झालं आहे.