Manasvi Choudhary
प्रत्येक विवाहित महिलेच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. आजकालच्या महिलांना भारी आणि जड दागिन्यांऐवजी वजनाने हलके आणि स्टायलिश दागिने घालणे जास्त आवडते.
तुम्हालाही लाडक्या बायकोसाठी कमी वजनात काहीतरी खास आणि सुंदर मंगळसूत्र पॅटर्न शोधत असाल तर ३ ग्रॅम सोन्यामध्ये बनवून घ्या.
सध्या फॅशन जगतात मिनिमलिस्ट डिझाईन्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. पातळ सोन्याच्या पेंडंटमध्ये खाली छोटी नाजूक चैन टॅसल असणारा हा पॅटर्न साड्यांवर आणि वेस्टर्न ड्रेसवरही खूप युनिक दिसतो.
लहान फुलांची नक्षी किंवा कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील पेंडंट तुम्ही निवडू शकता.
३ ग्रॅम वजनामध्ये तुम्ही कोरीवकाम केलेले नाजूक मोराच्या पिसाच्या आकाराचे पेंडंट निवडू शकता. हे पारंपारिक मराठी लूकसाठी अत्यंत सुंदर आहे.
लहान सोन्याच्या मण्यांचे वर्तुळ किंवा गोल रिंग असलेली मंगळसूत्र पेंडंट डिझाईन साधी आणि उठून दिसते.
प्रेमाचे प्रतीक असणारा 'हार्ट शेप' तुम्ही निवडू शकता. नाजूक सोन्याच्या चेनमध्ये हे लहान आकाराचे हार्ट पेंडंट बायकोला नक्कीच आवडेल.