Raksha Bandhan 2026: भावाला राखी बांधताना ३ की ५, किती गाठी बांधाव्यात? जाणून घ्या

Manasvi Choudhary

रक्षाबंधन

भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावा राखी बांधते.

Raksha Bandhan 2026

राखी बांधण्याची योग्य पद्धत

मात्र, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न नेहमीच असतो की, भावाला राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात? ३ की ५?

Raksha Bandhan 2026 | Google

किती गाठी बांधाव्या?

अनेक परंपरांमध्ये राखीला ३ गाठी बांधण्याची पद्धत आहे. राखी बांधताना तीन गाठी बांधणे अत्यंत पवित्र मानले जाते

Raksha Bandhan 2026

राखीच्या ३ गाठींचे महत्त्व (Significance of 3 Knots)

राखीची पहिली गाठ ब्रम्हदेवाशी संबंधित असून जीवनाची नवी सुरुवात व प्रगतीचे प्रतीक आहे.

राखीची दुसरी गाठ भगवान विष्णूशी संबंधित असून आयुष्यात सुख, शांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी बांधली जाते.

राखीची तिसरी गाठ भगवान शिवाला समर्पित असून भावाच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यास मदत करते.

Raksha Bandhan 2026

राखीच्या ५ गाठींचे महत्त्व (Significance of 5 Knots)

काही घरांमध्ये किंवा विशिष्ट परंपरेनुसार राखीला ५ गाठी बांधल्या जातात. या ५ गाठी पंचमहाभूतांचे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश याचे प्रतीक मानले जातात.

Raksha Bandhan 2026 | Google

काय होतो अर्थ?

निसर्गाच्या या पाच तत्त्वांप्रमाणेच भावाचे आयुष्य निरोगी, सुरक्षित आणि ऊर्जेने असावे असा त्यामागचा अर्थ होतो.

Raksha Bandhan 2026

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: हृदय, मेंदू आणि स्किनसाठी दालचिनीचे ‘हे’ अनोखे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

cinnamon benefits for heart brain and skin
येथे क्लिक करा...