Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच आपल्या अभिनयासाठी चर्चेत राहिली आहे.
'केदारनाथ' चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अभिनेत्री सारा अली खानने नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका स्थळाला भेट दिली आहे.
साराने आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली आहे.
तिने आपल्या या खास नवीन वर्षाच्या सुरुवातीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
साराने कॅप्शनमध्ये "साराच्या वर्षाचा पहिला सोमवार, जय भोलेनाथ..." असे लिहिले आहे.
साराच्या या पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकार कमेंट्स करत आहेत.
अलिकडेच साराचा 'स्काय फोर्स' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.