Chetan Bodke
अभिनेता रणवीर सिंहने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्टायलिश कुर्त्यामध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडमधील सर्वात उत्साही आणि कायमच एनर्जेटिक असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये रणवीर सिंहचा समावेश केला जातो.
रणवीर सिंहने हा नवा अंदाज अनंत- राधिकाच्या ग्रँड रिसेप्शन इव्हेंटसाठी केलेला होता.
मल्टीकलरचा ट्रेडिशनल कुर्ता वेअर करून अभिनेत्याने हा नवा अंदाज केलेला आहे.
त्याच्या कुर्त्यावर सोनेरी वर्ख लावलेले दिसत असून तो या लूकमध्ये कमालीचा हँडसम दिसत आहे.
स्टायलिश हेअर स्टाईल आणि दाढी असा लूक करून त्याने नवीन फोटोशूट केले आहे.
अंबानींनी लग्नामध्ये सेलिब्रिटींना दिलेले घड्याळ वेअर करून रणवीरने हे फोटोशूट केलेले आहे.
शिवाय अभिनेत्याने ब्लॅक स्टायलिश गॉगल आणि काही ज्वेलरी वेअर करून अभिनेत्याने हे नवीन फोटोशूट केले आहे.
फोटोंमध्ये रणवीर सिंह खूपच सुंदर दिसत असून त्याच्या हँडसम लूकची कमालीची चर्चा होत आहे.