Chetan Bodke
सध्या बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे.
विशेष म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंहने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये विशेश ओळख प्रस्थापित केली आहे.
रकुलने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे.
रकुल प्रीत सध्या लव्हलाइफमुळे चर्चेत असून ती लवकरच बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत साखरपुडा करणार असल्याचे बोलले जात आहे.
रकुलने नुकतेच काही नवीन फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
रकुलने रेड कलरचा फुल्ल घागरा वेअर केलेला दिसत असून तिने सुंदर फोटोशूट केले आहे.
तिच्या ह्या घागऱ्यावर विविध फुलांचे डिझाईन्स दिसत असून तिच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहे.
रकूलने या लूकवर ग्लॉसी मेकअप केला असून स्टायलिश ज्वेलरी परिधान केली आहे.
रकुलच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.