Gangappa Pujari
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.
विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.
रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.
पण ‘पॉकेटमनी’ मिळवण्यासाठी तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.
आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.
रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.