Chetan Bodke
टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रियामणीच्या सध्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
नुकतच प्रियामणी ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘भामाकलपम २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणारी प्रियामणी सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट साडी वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.
प्रिंटेड व्हाईट साडी, फॅन्सी ब्लाऊज आणि हटके फॅशन करत अभिनेत्रीने आपला संपूर्ण लूक केला आहे.
माथ्यावर बिंदी, ग्लॉसी मेकअप, लूकला साजेसे दागिने आणि हटके गजरा तिने केसात माळला आहे.
नव्या फोटोमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
प्रियामणी लवकरच अजय देवगणसोबत ‘मैदान’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रियामणीच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे..