Chetan Bodke
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या टेलिव्हिजन सिरियलमुळे तितीक्षा तावडेची प्रसिद्धी कमालीची वाढली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी, तितीक्षासध्या फॅशनमुळे कमालीची चर्चेत आली आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, तितीक्षाने लाल रंगाची डिझायनर साडी वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.
डिझायनर साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
"Just a red bit obsessed" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तितीक्षा आणि सिद्धार्थचा एक रोमँटिक फोटो देखील आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी, तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेने लग्नगाठ बांधली आहे.
रिल लाईफमध्ये जमलेली जोडी रियल लाईफमध्येही एकत्र आली आहे. सध्या ह्या कपलवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.