Chetan Bodke
सध्या अनेक सेलिब्रिटी न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशामध्ये जाताना दिसत आहे.
नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही विमानतळावर स्पॉट झाली.
सिंपल कपडे, नो मेकअप लूक आणि एक महागडी हँड बॅग अशा हटक्या लूकमध्ये नोरा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
नोराचा एअरपोर्ट लूक जोरदार व्हायरल होत असून तिच्या हातात असलेल्या त्या बॅगची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हाईट अँड पिंक कलरचं कॉर्ड सेट असा सिंपल डिंपल लूक तिने परिधान केला.
नोराच्या त्या हँड बॅगची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
'द फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्रीची हर्मस बर्किन ब्रँडच्या हँड बॅगची किंमत ६.६५ लाख इतकी किंमत आहे.
नोराच्या फॅशनची चर्चा नेहमीच होत असते. अनेकदा तिच्या फॅशनची कॉपी अनेक बॉलिवूड अभिनेत्री देखील करत असतात.
नोराने ‘दिलबर दिलबर’, ‘हाय गर्मी’, ‘कमरिया’ या आणि अशा अनेक गाण्यांतून आपली ओळख निर्माण केली आहे.