Priya More
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय फॅनश आणि सौंदर्याच्या बाबतीत इतर अभिनेत्रींना टक्कर देते.
इंडियन असो वा वेस्टर्न दोन्ही ड्रेसिंगमध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसते.
मौनी रॉयने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
मौनी रॉयने केशरी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच प्रतिम दिसत आहे.
डोक्यावर ओढणी, सुंदर चोकर नेकलेस, डोक्यावर हेडबँड, हातावर मेहंदी, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आणि कपाळावर टिकली असा मौनीने लूक केला आहे.
मौनी रॉयच्या या फोटोंवरून नजर हटवणे देखील चाहत्यांना कठीण झाले आहे. प्रत्येक जण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
या फोटोमध्ये मौनी रॉय राजकुमारीसारखी दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
मौनीचे हे फोटो पाहून ती काही तरी डान्स ड्रामा शूट करत असल्याचे दिसून येत आहे.
मौनी रॉयच्या या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.