Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच आपल्या फिटनेससाठी आणि हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते.
फिटनेस फ्रिक मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
जरीही चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतंच मलायकाने इन्स्टाग्रामवर स्टनिंग लूकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये मलायकाने काळ्या रंगाचा फूल स्लिव्हज गाऊन घातला आहे.
अभिनेत्रीच्या डिझायनर गाऊनच्या कॉलरवर डायमंड क्रिस्टेलची डिझायन पाहायला मिळत आहे.
मलायकाने परिधान केलेला डिझायनर गाऊन 'रिझमान रुझैनी' ब्रॅंडचा असून तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त याची किंमत आहे.
डिझायनर गाऊनवर अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरीसह लूक पूर्ण केला आहे.
या वयातही इतका फिटनेस आणि मलायकाची मादक अंदाज पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.