Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन कायमच आपल्या फॅशनमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत असते.
नुकतंच क्रितीने सोशल मीडियावर मल्टीकलर साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रितीने रेड आणि पिंक कलरची साडी परिधान केली आहे.
फुल्ल स्लिव्ह्स ब्लॅक ब्लाऊज, कानामध्ये झुमके आणि निखळ सौंदर्य फोटोमध्ये दिसत आहे.
कृती सेनॉनच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
किर्तीच्या लूकची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
क्रितीच्या या फोटोंना साडेचार लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासमोर पोज कशा द्याव्यात हे क्रितीला चांगलचं ठाऊक आहे.
सध्या क्रिती नुकतीच 'आदिपुरूष' आणि 'गणपथ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.