Chetan Bodke
'सत्यप्रेम की कथा', 'शेरशाह' आणि 'कबीर सिंह' या चित्रपटांमुळे अभिनेत्री कियारा अडवाणी सर्वाधिक प्रकाशझोतात आली होती.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या कियाराने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक हटके फोटोशूट केला आहे.
कियाराने नुकतंच इन्स्टाग्रामवर 'झी सिने अवॉर्ड्स २०२४' या पुरस्कार सोहळ्या निमित्त हटके फोटोशूट केले आहे.
पिंक कलरचा फॅन्सी ड्रेस आणि त्यासोबतच एका पेक्षा एक हटके फोटो पोजेस कियाराने दिल्या आहेत.
या ड्रेसवर कियाराने व्हाईट डायमंड नेकलेस वेअर करत क्यूट स्माईल देत फोटो शेअर केले आहेत.
या हटके आऊटफिटमध्ये कियाराने स्मोकी मेकअप केला आहे. या स्टाईलमध्ये कियारा खूपच खुलून दिसते.
दरम्यान, कियाराच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
कियाराच्या नव्या स्टाईलचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
कियाराच्या ह्या मोहक फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.