Gangappa Pujari
बाॅलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून कॅटरिना कैफचे नाव घेतले जाते.
गेली दोन दशके ती चित्रपटसृष्टीत चांगलीच आघाडीवर आहे.
स्वबळावर तिने बाॅलीवूडमध्ये (Bollywood) स्वत:चे नाव कमावले आहे.
आज सर्वात आघाडीच्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे.
आज तिला तिच्या अनेक हिट चित्रपटांकरता ओळखले जाते.
कॅटरिना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
सध्या तिच्या दिवाळी स्पेशल लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोनेरी साडीत कॅट खूपच सुंदर दिसत आहे.