Chetan Bodke
करिश्मा कपूर 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
कायमच अभिनेत्री सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत राहते.
करिश्माच्या नव्या फोटोंबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने ब्लॅक रंगाची शर्ट पँट परिधान करत चाहत्यांसोबत नवे फोटो शेअर केले.
ब्लॅक रंगाच्या आउटफिट्सवर करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे. सध्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.
या लूकवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला आहे.
करिश्मा कपूरने बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. सोशल मीडियासह सर्वत्रच तिचा मोठा फॅन्सक्लब आहे.
करिश्मा कपूरचा २००६ मध्ये ‘मेरे जीवन साथी’ हा शेवटचा चित्रपट आहे.
करिश्माने ‘मदरहुड’ या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केलं आहे.