Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. करीना कायमच इन्स्टाग्रामवर खास स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.
वयाच्या ४२ व्या वर्षी देखील करीनाचं सौंदर्य कमी झालेलं नाही. ती कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
नुकतंच करीनाने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा फुल्ल गाऊन वेअर करत स्टायलिश लूक शेअर केला आहे.
अभिनेत्री या नव्या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
करीना वयाच्या ४२ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
मोकळे केस आणि स्मोकी मेकअप असा करीनाचा अनोखा अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
करीनाच्या सौंदर्याचे कौतुक फक्त चाहतेच करत नाहीत तर अनेक सेलिब्रिटीही करत आहेत.
करीनाच्या ह्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.