Priya More
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सौंदर्य आणि हटके स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते.
जान्हवी कपूर वेस्टर्न वेअर असो किंवा इंडियन वेअर म्हणजेच साडीमध्ये खूपच सुंदर दिसते.
जान्हवी कपूरने नुकताच एका इव्हेंटमध्ये लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केली होती.
या इव्हेंटमध्ये जान्हवी कपूरकडेच साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. जान्हवीचा सिझलिंग लूक सर्वांना प्रचंड आवडला.
जान्हवी कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या साडी लूकमधील फोटो शेअर केलेत.
सोशल मीडियावर देखील जान्हवी कपूरने साडी लूकच्या माध्यमातून सर्व लाइमलाइट लुटले आहे.
जान्हवी कपूरने या एथनिल लूकद्वारे चाहत्यांना घायाळ केले आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूरच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे.
जान्हीव कपूरच्या या फोटोंना साडेसहा लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.