Chetan Bodke
बॉलिवूडची ‘श्रीलंकन ब्युटी’ म्हणून जॅकलिन फर्नांडिसची ओळख आहे.
बॉलिवूडमधील मोस्ट ब्युटिफुल आणि मोस्ट गोर्जियस ॲक्टर्सच्या यादीत जॅकलिनचे नाव आवर्जून घेतले जाते.
नुकतेच जॅकलिनने काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नव्या फोटोंमध्ये जॅकलिनने पीच रंगाची साडी परिधान केली असून तिच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते.
पेस्टल रंगाचो साडी आणि गोल्डन इअरिंग्स अशा सुंदर लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.
सध्या जॅकलिनच्या नव्या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.
आपल्या बोल्ड अदांनी आणि सौंदर्याने जॅकलिन चाहत्यांना भुरळ पाडते.
जॅकलिनचा पुढच्या वर्षी ‘वेलकम टु द जंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे.
जॅकलिनचे ‘सर्कस’ आणि ‘रामसेतू’ हे दोन चित्रपट शेवटचे आहेत.