Priya More
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने हजेरी लावली होती.
अनंत-राधिकाच्या लग्नाला दिशा पटानीने ग्लॅमरस लूक केला होता. दिशाने यावेळी साडी नेसली होती.
दिशा पटानीने डिझायनर ब्लाऊज आणि लेमन कलरची नेटची साडी नेसली होती.
दिशाने कर्ली हेअर, सेटल मेकअप आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला होता.
दिशा पटानी आपल्या या रिवीलिंग लूकमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.
दिशा पटानीच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेटकरी हैराण झाले आहेत. त्यांनी या लूकवरून तिला ट्रोल केले आहे.
'हिला स्टाइलिश बदलण्याची गरज आहे', 'नेहमी एकच लूक', अशाप्रकारच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.
'दिशा पटानीला पाहून बोर होतंय', 'नेहमी वल्गर दिसण्याची गरज नाही.', असं देखील काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
दिशा पटानीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना ९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.