Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘फायटर’ चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.
चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
सध्या दीपिकासोबत हृतिकही प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच दीपिकाने प्रमोशननिमित्त एक हटके फोटोशूट केलय.
अभिनेत्रीने प्रमोशनवेळी व्हाईट शॉर्ट येलो ब्राऊन कलरची फॉर्मल पँट आणि त्यावर खाकी कलरचा स्वेट टी-शर्ट तिने परिधान केला आहे.
दीपिकाच्या फॅशनची फक्त देशातच नाही तर परदेशातही जोरदार चर्चा होते.
यावेळी दीपिकाने ग्लॉसी मेकअप केला असून स्मोकी आयलायनर लावत तिने आपला संपूर्ण लूक केला आहे.
त्यासोबतच आपल्या लूकला मॅचिंग हाय हिल्स सँडल वेअर केली आहे.
अवघ्या काही तासातच दीपिकाच्या या लुकला चाहत्यांकडून ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंटसचा वर्षाव केला आहे.
दीपिकाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.