Chetan Bodke
दीपिका पदुकोणचे नाव आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.
नुकतंच दीपिकाने लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ‘अकादमी संग्रहालय गाला’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.
या कार्यक्रमातील फोटो दीपिकाने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी कार्यक्रमामध्ये, दीपिकाने जांभळ्या रंगाचा वेलवेट फुल्ल गाऊन परिधान करत हटके फोटोशूट केले आहे.
दीपिकाने या ड्रेसवर, डायमंडचे कानातले आणि हातात सिल्व्हर रंगाचे ब्रेसलेट घालून लूक पूर्ण केला आहे.
सध्या दीपिकाच्या फॅशनचीच नाही तर अभिनयाचीही परदेशात जोरदार चर्चा सुरु आहे.
दीपिका गेल्या काही दिवसांपुर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती.
ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दीपिका पहिलीच अभिनेत्री आहे.
दीपिका यावर्षी ‘पठान’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आली होती.