Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या नवनवीन लूकमुळेही नेहमी चर्चेत असते.
भूमी पेडणेकर अजूनही 'भक्षक' चित्रपटामुळे कमालीची चर्चेत असून तिच्या अभिनयाची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.
भूमी पेडणेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमीने पिवळ्या रंगाचा बांधणी स्कर्ट आणि क्रॉप ब्लाऊज वेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
भूमीने हा हटके लूक शेअर करताना, ‘ओए होए #ShaadiSeason’ असे कॅप्शन दिले आहे.
भूमीने हा लूक एका लग्नासाठी केला होता. यावेळी अभिनेत्रीने कानातले, बांगड्या आणि बाजूबंद परिधान करत सर्वांचेच लक्ष वेधले.
भूमीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भूमीचा स्टनिंग लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.
अभिनेत्रीच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे.