Chetan Bodke
अभिनेत्री आणि निर्माती माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या अदाकारीने आणि एव्हरग्रीन सौंदर्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधते.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी परिधान करून हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
माधुरीने पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाचा कॉटनचा कोट परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केले.
'Wrapped in sunshine, draped in elegance' असं कॅप्शन देत धकधक गर्लने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या मिरर वर्क साडीतले सुंदर फोटो शेअर केले.
फॅशनेबल साडीवर माधुरीने सुंदर दागिने परिधान केले असून तिच्या साडीवर मिरर वर्क केलेले दिसत आहे.
फोटोशूटसाठी माधुरीने हलका मेकअप लूक केला असून केसांची नॉर्मल हेयरस्टाईल केली आहे.
माधुरीने या लूकवर झुमके आणि हीलची सँडल घालून हटक्या अंदाजामध्ये फॅशन केली.
माधुरीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून अवघ्या काही तासांतच ९० हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत.
‘पंचक’ चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.