Chetan Bodke
२०१२ मध्ये रिलीज झालेल्या पुनित मल्होत्रा आणि करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे.
कधी आपल्या अभिनयामुळे तर कधी आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाचा आज ३१ वा वाढदिवस. आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला आहे.
'हायवे', 'स्टूडंट ऑफ द इयर', 'गंगूबाई काठियावाडी', 'राझी', 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
आलिया सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असून ती एका चित्रपटासाठी सुमारे १० कोटी रुपये मानधन घेते.
आलियाची ५१७ कोटींची संपत्ती असून तिचे भारतासह परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे.
२०१८ मध्ये लंडन येथील कोव्हेंट गार्डनमध्ये आलियाने २५ कोटींचं घर खरेदी केले. तिचं ते घर लंडन मधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये आहे.
तर, २०२० मध्ये मुंबईतल्या वांद्र्यामधीस पाली हिल्स याठिकाणी आलियाचं स्वत:चं घर आहे. एकाच बिल्डिंगीत आलियाचं पाचव्या मजल्यावर, तर रणबीरचं सातव्या मजल्यावर घर आहे.
आलियाकडे महागड्या कारचे कलेक्शन आहे. तिच्याकडे रेंज रोव्हर आणि BMW 7 अशा दोन महागड्या कार आहेत.
त्यासोबतच, तीन ऑडी कार्स, दोन एसयूव्ही कार्स तर सेडान ऑडी A6 कार देखील तिच्याकडे आहे. तर मुंबईत अभिनेत्रीचे तीन घर आहेत.
आलिया भट्ट Add-A-Mamma नावाच्या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे. तिने हा व्यवसायाची इशा अंबानीसोबत घोषणा केली होती.
प्रसिद्ध अभिनेत्री असलेली आलिया २०१९ पासून इंटर्नल सनशाइन प्रॉडक्शन नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आहे.