Chetan Bodke
अभिनेता शाहिद कपूर सध्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
शाहिद आणि क्रितीचा रोमान्स या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असून सध्या हे जोडी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. नव्या फोटोमुळे अभिनेत्याच्या फॅशनची जोरदार चर्चा होतेय.
शाहिदने नुकतंच ब्लॅक कलरचा कॅज्युअल आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्लॅक कोट, राखाडी शर्ट आणि ब्लॅक पँट असा लूक अभिनेत्याने केला असून ब्लॅक गॉगल घालत त्याने सुंदर फोटोशूट केला आहे.
चॉकलेट बॉय शाहिद कपूर या लूकमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. त्याच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
शाहिदने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
अवघ्या काही तासांमध्ये शाहिदच्या या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याचे फोटो पाहून पोरी फिदा झाल्यात.