Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
आयुष्मानने 'ड्रीम गर्ल' आणि 'ड्रीम गर्ल २'मधून दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. दमदार अभिनयाच्या जोरावर आयुष्मानला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
नुकत्याच पार पडलेल्या सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यात आयुष्मानला 'स्टार ऑफ द डेकेड' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यात आयुष्मानला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने प्रेक्षकांचे आभार मानले.
शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्मानच्या हातात ट्रॉफी असून त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल दिसत आहे.
" मी 'सकाळ मीडिया'चा आभारी आहे! 'स्टार ऑफ द डेकेड' पुरस्कार मिळाला" असं कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केला आहे.
आयुष्माननं २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'विकी डोनर' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'अंधाधुन' चित्रपटातून आयुष्मानच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.